परवाचीच गोष्ट ! जवळच्या , स्थानिक बाजारात फिरत होतो. तिथं काही वस्तू मिळाल्या तर काही नाही मनाला लगेच विचार आला की ७० घ्या दशकासारखे
जर आपण महाल बाजारात ( अर्थातच नागपूरच्या) फिरत असतो तर सारे काही मिळून गेले असते ! मग काय,सारा महाल बाजारच आठवून गेला !
हा महाल बाजार (७०च्या दशकातला, बरं का) , आपण तीन भागात विभाजित करून शकतो. पहिला भाग म्हणजे कल्याणेश्वर मंदिर , गणेश मंदिर घ्या आसपासचा परिसर आणि बंदिस्त भाजी बाजार ,दुसरा
केळीबाग रोड आणि तिसरा म्हणजे नरसिंग टाकीज ते
टिळक पुतळा रस्ता.
गणेश मंदिराच्या अवतीभवती आणि समोर धान्याची दुकानं होती आणि बंदिस्त भाजी बाजाराला तीन प्रवेश द्वार ! या बाजारात ,भाजी व्यतिरिक्त ,पुजेचे साहित्य,
पत्रावळी इ पण मिळून जातं. राजविलास टाकीज कडच्या द्वारातून खाली उतरले की तिथं पण काही भाजीवाले बसत व यांचे दर ,वरच्यांपेक्षा कमी रहात.
कोतवाली समोरच्या प्रवेश द्वारातून बाहेर पडले की डाव्या बाजूला , आग्रा भंडार ( खवा जिलेबी !) आणि
उजव्या बाजूला , श्रीरंग स्टील.आता केळीबाग रोड वर आलो की इथं काही जनरल
आणि सौंदर्य प्रसाधन यांची दुकानं , तसेच आंबेकर तुप आणि लोणी व रमेश ग्रामोफोन.पुढे बडकस चौकात
राम भंडार (पेढे!).नंतर , नरसिंग टाकीज ते टिळक पुतळा या मार्गावर, अनेक प्रसिद्ध दुकानं होती. जसे औषधांसाठी , मुकुंद राय आणि अमृत फार्मसी , स्टेशनरी, कॅलेंडर, पंचांग साठी ठाकूर आणि कंपनी , कर्मवीर बुक डेपो. टिळक पुतळा चढावानजीक ,कोकणी आणि कोल्हापूरची चपलांचे दुकान.महाल बाजाराचा एक विस्तार (extension) म्हणजेकल्याणेश्वर - झेंडा चौक मार्गे. यावर गणपतीत , गणेश मूर्ती , ऋषीपंचमीच्या आधी ,हातसडीचे तांदूळ मिळून जातं. याच मार्गावर पुढे काही लाह्या -फुटाणे वाले(भडभूंजे) यांची दुकानं होती.वरील वर्णनावरून हे अगदी सहज लक्षात येईल की,त्या काळी ,आपला महिला बाजार हा समग्र आणि परिपूर्ण होता. कापडचोपड , काॅलेज पुस्तकें यासाठीइतवारी ,बर्डीला जावे लागत असे,हा भाग वेगळा! आता सारे पार बदलून गेलं आहे , असं ऐकतो. काळानुसार ,बदल हे होणारच. तरी त्या गोड , रम्य आठवणी, मनात कायम राहतील ,हे ही खरे !