विदर्भात साबुदाणा खिचडीला

विदर्भात साबुदाणा खिचडीला

आमच्या विदर्भात अकोला, अमरावती कडे साबुदाणा खिचडीला उसळ म्हणतात...आणि शेंगदाणे न म्हणता दाण्याची उसळ...बोलले जाते....

खिचडी म्हणजे तुरीची डाळ...आणि तांदूळ तीही प्लेन पिवळी खिचडी....चार वाट्या तांदूळ तर दीड वाटी तुर डाळ....त्यात मस्त हळद मीठ घालून शिजवलेली साधी पिवळी खिचडी... कधीतरी साजूक तूप घालून खाल्लेली तर कधी कधी गरम गरम खिचडी तूर डाळ घालून केलेली आणि त्यावर मस्त तेलात तळलेले.....लसूण तुकडे....भरपूर मोहरी...त्यातच तळलेली लाल मिरची....आहाहा त्याबरोबर तोंडी लावायला...आंब्याचे लोणचे आणि भाजलेला पापड....

आणि ऐका बुक्कीत फोडलेला पांढरा कांदा...आणि बरोबर फोडणीचे तुरीचे वरण....अहाहा काय चवदार लागत म्हणून सांगू....मस्तच विदर्भातील खिचडी ज्या ज्या भागातील खासियत आणि त्याच भागात चवदार लागणारा हा पदार्थ....बहुतेक रात्रीचा मेनू असतो म्हणजे असतोच.....आणि खाण्याचा कधीच कंटाळा येत नाही....असा रात्री जेवणात केलेला

आता केळीचे शिकरण....कोणी नाव शोधून काढले असेल हो.....भाजी असो की नसो.. केळी दुधात कुस्करून साखर घालुन पोळी बरोबर खाण्यात मजाच वेगळी....शेंगदाणे चटणी नाहीतर लोणचे बरोबर असले की झालेच...त्या दिवशी वरण भाताला सुट्टीच...

मला तर केळीचे शीकरण वरून साजूक तूप आणि पोळी खायला आवडतं...पण घट्ट दूध हवं, खाऊन तर बघा कुणीही कमेंट करू नये की आयुर्वेदात निषिध्द मानले गेले आहे की.....दुधात केळी विरुध्द अन्न....पण चालत कधी तरी....रोज नाहीच ना... 

आमच्या लहानपणी गोडाचा पदार्थ म्हणजे केळीचे शिकरण.... एखादी पोळी जास्तच जायची...आणि दुपारी डुलकी लागलीच म्हणून समजा हो ...तेव्हा गोडाचे पदार्थ म्हणजे सुधा रस साखरेचा पाक करून त्यात लिंबू पिळून वेलची पूड घातली की सुधारस पोळी बरोबर खाण्यास तयार...कुणी वेळेवर पाहुणा आला की सुधारस, रव्याचा गोड शिरा,केळीचे शिकरण पटकन होणारे पदार्थ.....विकतचे पदार्थ आणणे नसायचे. साखर आंबा , असायचाच घरात....पौष्टीक घरगुती पदार्थ...

रसमलाई पदार्थ तेव्हा तरी आम्ही खाल्लेला नव्हता.आणि विशेष म्हणजे कडधान्य मूग, मटकी, चणे भिजवून केलेली भाजीला पण उसळ म्हणतात...आहे किनई गंमत..नावाची.

नसेल आवडत कुणाकुणाला हाताने केळी कुस्करून तर मस्त सुरीने केळीचे पातळ काप करून गोड दुधात अलगद हळुवार सोडून द्यावेत.आणि साजूक तूप लावलेली पोळी त्याबरोबर आस्वाद घ्यावा 

केळीचे कालवण पण म्हणतात कुठे कुठे.....

मामाची बायको सुगरण रोज रोज पोळी शिकरण असा गाण्यात उल्लेख आढळतो  सुगरण असून शिकरन का करत असावी...पण गाण्यात यमक जुळले असेल हो सुगरण शिकरन असेही वाटते.किती फेमस गाणे झुकझुक अगिन गाडी धुरांच्या रेषा हवेत काढी..

आणि तेव्हा ते आवडीने खाल्ले पण जायचे मला वाटते आता क्वचितच होत असतील हे पदार्थ...आज आठवण झाली आणि शिकरन आपल्या प्रिय मैत्रिनीसाठी पण पाठवून द्यावे.... पण हा पदार्थ पाठवता येत नाही, आणि करून पण ठेवता येत नाही....कुणीतरी बरेच वर्ष झालेत पाहुणे येणार म्हणून केळीचे शिकरण करून फ्रिझमध्ये ठेवलेले पण वेळे वर काढले तर त्यातील केळी काळी पडलेली, माहिती नसल्याने वाया गेले...सांगा मग कशी वाटली साधी सोपी शीकरण रेसिपी

Share blog on whatsapp

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *