मंडळी! सध्या आपल्या श्रावण मास सुरू आहे आणि नागपूरात ,सारे वातावरण , एकदम भक्तीमय ,नाही का ? याच , अनुषंगाने ,काल असाच बसलो असताना ,
नागपूरच्या काही आठवणी मनात दाटून आल्या ,त्या इथं देण्याचा मोह मला आवरता आला नाही ! सत्तरच्या दशकाच्या प्रारंभी ,
मध्यप्रदेशातून अकरावी झाल्यावर ,मी
काॅलेज शिक्षणा करिता ,नागपूरात आजी-
आजोबांकडे आलो ,हे मागे सांगितले
आहेच.
----बहुतेक घरांमधे नैमित्तिक धार्मिक विधी
यांचे पौरोहित्य करणारे गुरूजी हे ठरलेले
असतात. आमच्या आजोबांचे ही होते ,
जवळच्या नाईक रोड वर राहणारे भैयाजी
काळी ! दर एकादशीला कुलदेवता व्यंकटेश
यांना अभिषेक करण्यासाठी ते आणि नंतर
त्यांचे मोठे वा लहान चिरंजीव येत असत.
--- तेव्हा ,धारस्कर गल्ली ,इतवारी इथं एक
नवीन बालाजी मंदिर स्थापन झाले होते. अधुनमधून माझे , दर्शनासाठी ,तिथं जाणं
होत असे. संध्याकाळी आरती नंतर बालाजी
यांचा टोप ,उपस्थीतांच्या डोक्यावर क्षणभर
ठेवण्यात येई अन् त्याची गंमत वाटे !
---तेव्हा श्रावण मासात ,अयाचित मंदिर, शिवाय सोनोबाची वाडी अश्या ठिकाणी
महिनाभर भागवत कथा चाले. मला आठवतं दुपारच्या ,वाडीत होणाऱ्या कथेला
अनेक महिला आणि माझी आजी , नियमित
हजेरी लावत !
---दर शनिवारी , सकाळी अकराच्या सुमारास ,एक रामदासी बुवा आणि सहकारी
झांज वाजवित ,भिक्षा मागायला येत व यासाठी ,वाटीत कणिक आणि पैसे आधीच
काढून ठेवत असू !
--- सकाळी स्वैपाक झाला की आजी ,एका
कर्दळीच्या पानावर ( घरीच कर्दळीचे झाड)
गाई साठी नेवेद्य काढून ठेवत असे- लहानशी
पोळी ,त्यावर मात वर्ण आणि भाजी. हा मग
दारावर येणाऱ्या गाईला लावण्यात येई !
--- साठच्या दशकातच माझे एक काका कै्
चंद्रशेखर वराडपांडे यांनी ,रेशीमबागला
आपल्या निवासस्थानी श्री गजानन महाराज मंदिर स्थापन केले. माझे इथं नियमित जाणं
होत असे. आमच्या आजीचा ,काकांवर विशेष लोभ ! त्यामुळे अनेकदा आजी तिथं
गुरूवार रात्रीच्या भजनाला ,दारावरचा
एखादा रिक्षा पकडून जात असे आणि दुसऱ्या दिवशी ,सकाळी परत येत असे !