Nagpur Santra Nagari

आपल्या गावाचे कुळ जाणून घेण्याची इच्छा असते, नागपूर शहराचा आभिमान वाळगावा एवढा प्राचिन इतिहास या नगरीला आहे,प्राचिन इतिहासाची साक्ष देणाऱ्या अनेक वास्तू या शहरात आहे,

बख्त बुलंद शहा या गोंड राजाने आपल्या राज्याचा विस्तार उत्तर पूर्व व वऱ्हाड पर्यत केला,१७०२ मध्ये त्यांनी आपल्या राज्याची राजधानी नागपूरला आणली, अनेक टोळ्याचे मिळून नागपूर शहर झाले, राजधानी म्हणून आज ३२० वर्ष पूर्ण होत आहे ,आपल्या भागात माोठया प्रमाणात संत्रयाचे उत्पादन होत असून ही संत्री जगात प्रसिद्ध आहे, या रुचकर संत्री मुळे या शहराचे नांव संत्रा नगरी पडले असले तरी , नागपूर हे देशाचा केंद्र बिंदू असल्यामुळे नागपूर शहराला विशेष् महत्व आहे.

बख्त बुंलद शहा यांनी नागपूर व गोंडवाना भागात कृषी व व्यापाराला चालना देण्यासाठी विविध राज्यातील व्यापारी व उद्योजकांना नागपूरात आणले,त्यांना जागा देवून बाजार पेठ निर्माण केली,

लावाण्यवती साठी विदर्भ प्रसिध्द

भगवान श्नीकृष्णाची पत्नी रुक्मिनी,नलाची पत्नी दमयंती, रघुवंशातील राणी अजानी,दशरथाची माता इंदुमती या विदर्भ कन्या होत्या त्यामुळे विदर्भ प्रांत लावण्यवती स्त्रियांसाठी अतिप्राचीन काळापासून प्रसिध्द होता.

बख्त बुलद शहाने राजधानी नागपुरात आणल्या नंतर सक्करदरा,फुटाळा, लेंद्रा,गाडगे,भानखेडा,धंतोली,सीताबर्डी या लहान टोळ्या एकत्र करून शहर केले,शहरात रस्तयांची निर्मिती, तसेच शहराचे रक्षण कर०यासाठी परकोटही बांधला तेव्हा नागपूर शहराचा दर्जा मिळाला,बुलंदशहाच्या मृत्यू नंतर त्यांचा मुलगा नांद सुलतान गादीवर बसला त्याने शुक्रवार तलाव बांधला,गोंड राजाने पाऊणशे वर्ष नागपूर वर राज्य केले

नागपूर व नागनदी ही नावे नागंवशीय लोकांच्या राहण्यांच्या ठिकाणावरुन पडली,असे मान०यात येते,त्यानंतर राजे रघुजी भोसले यांनी बलीशाह यांचा पराभव करुन नागपूरवर सत्ता मिळविली.त्यानंतर भोसले घरा०यांचा इतिहास सुरू होतो,ईस १८०० मध्ये रघुजी राजे भोसले यांचे राज्य अत्युच्च शिखरावर होते.

सिताबर्डी कित्ल्याची रचना

कित्ल्याची रचना दोन टेकडयात आहे,उत्तरेकडच्या टेकड़यांच्या पुढे जेथे सध्या कस्तुरचंद पार्क आहे तैथे साफ मैदान होते,पश्चिमे कडेअजब बांगला,विधान भवन आहे तेथे मैदान होते,मॉरीस कॉलेज हे त्या काळी रेसिडेन्सी होते.

१५ ऑगस्ट १९४७ ला देश स्वातंत्र्य झाल्या नंतर स्वंतत्र्य हिंदुस्थान चा ध्वज पंडित रविशंकर यांनी सीताबर्डी च्या किल्ल्हयावर फडकवला,१८५३ साली लयाला गेलेले नागपूरचे स्वातंत्र्य पुन्हा प्राप्त झाले,संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मीतीनंतर नागपूर सह व ऱ्हाड महाराष्ट्रात विलीन झाले,

नागपूर करारा नुसार नागपूरला उपराजधानीचा दर्जा मिळाला,आज नागपूर सामाजिक शैक्षर्णिक व सांस्कृतिक क्षेत्रात आघाडीवर आहें, नागपूर शहर संत्रा नगरी सारखे वाघांची राजधानी म्हणून देशात नव्हे तर जगात प्रसिद्ध आहे, नागपूरची संत्री जगातील अनेक राष्ट्रा मध्ये पोहोचली असल्या मुळे शहराला संत्रा नगरीचा लौकिक मिळाला आहे.

नागपूरची वैशिष्ट पवित्र दीक्षाभूमी, रा स्व संघाचे मुख्यलय, आंतरराष्ट्रीय विमान तळ्, मेट्रो, मिहान,अजंब बंगला, उच्चन्यायालय,रिझर्व्ह बँक आदी

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *