नागपूर सत्तरच्या दशकातलं

नागपूर सत्तरच्या दशकातलं

नागपूरात काही काळ राहून गेलेल्या व्यक्तिला ,तिथल्या आठवणी या येतच

असतात ! ७० घ्या दशकात ,- वर्षं ,माझे

वास्तव्य तिथे होते ,काॅलेज शिक्षणाकरिता

नंतर बाहेर पडलो. आता इतकी वर्षे उलटली

तरी तेथिल आठवणी , अधुनमधून , मनात

रूंजी घालत असतात आणि मुख्य म्हणजे त्या आजही , टवटवीत आहेत ! पूर्वी त्यांचा

"जिक्र' झालेला आहे ,तरी फिरून एकवार

त्या रंजक वाटाव्या !

---त्या काळची एक खासियत म्हणजे मिल

चे भोंगे ! तेव्हा नागपूरात ,एम्प्रेस मिल,

शुक्रवार तलावाजवळ आणि माॅडेल मिल,

गणेशपेठ ,या कार्यरत होत्या यांचे काम

२४ तास , पाळ्यांमधे चालायचे. वेळेच्या

सूचनेकरिता हे भोंगे वाजत. त्यांच्या वेळा

काहीश्या अश्या होत्या: सकाळी साडेपाच,

साडेसहा ,पावणेसात ,सात ,पावणे अकरा.

दुपारी अडीच ,पावणे तीन. सायं. सात आणि रात्री ,पावणे अकरा. अनेक घरांची

दैनंदिन कामं ,या भोंग्याबरहुकुम चालत ,

जसे पहाटे साडे पाचला उठणें , दुपारी अडीच ला चहा आणि रात्री पावणे अकरा ला,झोपी जाणे ! थोडक्यात ,हे भोंगे ,जीवनाचा अविभाज्य अंग झालेले

होते !

---काहीसे असेच स्थान ,त्या काळी , रेडिओ ला सुद्धा लाभलेले होते ! घराघरात

नागपूर "' आणि नागपूर "' म्हणजेच विविध भारती हे सुरू असत ! अनेक घरांची

बरीच कामं ही , घड्याळ पहाता , रेडिओ

च्या , कार्यक्रम प्रमाणे होत असत ! नागपूर

आकाशवाणी चा ,पहाटेचा , भक्ती गीतांचा

कार्यक्रम " अर्चना ' किंवा आपली आवड

तसेच विविध भारतीचे जयमाला किंवा

रात्रीचे छायागीत आणि बेला के फूल,

आजही आठवतात !

----त्या काळी चालणाऱ्या सिटी बस क्रमांक

आणि , अयाचित मंदिर ते श्रद्धानंद पेठ,

यांचा , अगदी विद्यार्थी , नोकरी करणारे आणि इतर यांना फार उपयोग होत असे कारण या बसेस जुनं नागपूर ( पुला अलिकडचे) आणि नवीन नागपूर (पुला

पलिकडचे) यांना जोडण्याचे काम , छान

पार पाडीत आणि अगदी महाल , टिळक

पुतळा ,काॅटन मार्केट ,बर्डी , धरमपेठ, शंकर

नगर , लक्ष्मीनगर असे एरिया कव्हर करीत,

ते सुद्धा अत्यल्प रकमेत !

---त्या काळचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे , जनजीवन कसे निवांत असायचे !

आॅफिस वाली मंडळी , सहाच्या आत घरी,

विद्यार्थ्यांच्या मागे , कोचिंग क्लास चा

ससेमिरा लागला नव्हता ! महिला वर्गाला

दुपारचा वेळ रिकामा मिळायचा ,ज्याचा

उपयोग ,एकामेकांकडे , बसायला जाणे,

यासाठी वापरला जात असे.

आता सारं , बरंच बदललं आहे आणि काळानुसार ,बदल हे होणारच ! तरी , वरील

विवरण वाचून ,समकालीनांना ," जाने कहां

गए वो दिन ' किंवा " गुजरा हुआ जमाना,आता नहीं दुबारा ' असं काहीसं

वाटून जाणार ! खरं ना ?

Share blog on whatsapp

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *