नागपूर कुछ यादें सिनेमाघरोंकी

नागपूर कुछ यादें सिनेमाघरोंकी

कालचीच गोष्ट. समूहावर अलिकडे आलेल्या काही पोस्ट चाळत बसलो होतो. तर इथं ,जुन्या घरांची ठेवण विदर्भातील

काही एसटी रुट , श्रावण मास ,काॅलेज शिक्षण विषय चर्चिले गेले आहेत,असे

दिसले. पण इथली सिनेमागृहे आणि सिनेमा

यावर अभावानेच काही वाचायला मिळाले आहे ! मी काही सिने शौकीन नाही पण

१९७०-७७ काळच्या काही आठवणी तर

नक्कीच आहेत - सिनेमा गृहं आणि सिनेमा

यांच्या ! आज ,त्यांना एक उजाळा !

पहिली गोष्ट सांगायची ती ही की त्या काळी,नागपूरात सिनेमागृहे ही ,दीड डझनाच्या वर होती. गंमत म्हणजे यातील

अर्धा डझनाच्या वर , लोखंडी पूल ओलांडला की ,बर्डी एरियात वसलेली होती

अगदी आनंद-वसंत पासून ते रीगल- रीजंट

पर्यंत ! रीजंटला बहुदा मराठी सिनेमे लागत

असत तर सदरच्या लिबर्टीला इंग्रजी ! सरोज

( म्हणजेच नंतरची सुदामा- आता नामशेष) ही बहुदा १९७३ नंतर आकाराला आली

असावी.

तेव्हाचे पाॅश थिएटर्स म्हणजे पंचशील,

लिबर्टी आणि सरोज ,नाही का ? घराच्या

सर्वात जवळ म्हणजे नटराज आणिनंतर

राजविलास , नरसिंग. नरसिंगला जय

संतोषी माता ,तूफान चालल्याचे स्मरते,

महिला वर्गाच्या उदंड प्रतिसादामुळे ! या

काळात ,माझे सिनेमाला जाणे तसे फार

नव्हते पण दिग्दर्शक श्याम बेनेगल आणि

जया भादुडी यांची क्रेझ ! आता विषय

निघालाच आहे तर पाहिलेले काही सिनेमे

असे: नटराज ( जवानी दिवानी बाॅबी,सामना) ,राजविलास( शोर ,ज्यूली)

आनंद (परिचय ,दाग) ,रीगल (अनुभव, कोशिश ,कोरा कागज) , सरोज (निशांत)

 

आणि लिबर्टीला ,- इंग्रजी.

समकालीन सदस्यांच्या पण अश्याच काही

आठवणी असतील ,खरं ना

Share blog on whatsapp

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *