एक वेगळाच विचार येऊन नागपूर ची आठवण झाली...लिहू की नाही हा विचार करू लागले...मग म्हटले आपले नागपूरकर मनानी खूप छान आहेतच...बघू शेअर करून म्हणून लिहिले.
मी १९८७ ते १९९३ मध्ये १२ वी मग कॉलेज चा काळ आठवतेय..मनाला ती लहानपणापासूनची अधोरेखित झालेले क्षण डोळ्यापुढून अव्याहतपणे चाललेत.
शिक्षण सुरू असताना आपण कसं वेड्यासारखे अभ्यास तर करायचो पण तेवढीच धमालही करत होतो..शाळेत , कॉलेज मध्ये जाताना रस्त्यावरून प्रत्येक बाबतीत आम्ही काहीतरी मज्जा शोधून काढून सोबत असलेल्या मैत्रिणी बरोबर खूप हसायचो..मग ती फॅशनअसो की रस्तावर जाणारी माणसं, हात ठेल्यावरून सामान विकणारा माणूस कसा आवाज काढतो किंवा कुणाचे चालणे बोलणे असो ( पण कुणाचा उपहास म्हणून नाही केला) अशा लहान सहान गोष्टीवरून विषय काढून जाम हसून हसून पुढे चालत राहायचो.. कदाचित आम्हाला बघून पण कुणीतरी हसलेच असतील...आम्ही मैत्रिणी जरा जास्तच डांबिस होतो...त्यावेळेला ना आम्हाला pictures ( movies) चे खूपच कौतुक होते म्हणून picture चे पोस्टर्स बघणे हा आमचा छंद होता...प्रत्येक पोस्टरला निरखून बघत राहणे आणि त्यातल्या hero heroin आणि त्यावर लिहिलेली संपूर्ण माहितीही आम्ही बघत असू.आम्हाला त्यात खूप आनंद मिळायचा. आमची एक मैत्रीण होती तिला आमचे असे वागणे आवडायचे नाही.मग ती आम्हाला पोस्टर्स आले की थांबून म्हणायची ,"हा आता बघा तुम्ही पोस्टर्स मी थांबते हवा तितका वेळ". तिची प्रतिक्रिया सहज होती कारण आम्ही तो नित्यक्रमच बनवला होता,तिला चिडचिड व्हायची पण ती चिडचिड पण मैत्रिणीचे प्रेम समजून आम्ही पुढे जायचो....त्या वेळेस आम्ही कॉमर्स मध्ये शिकत होतो आणि बर्डीवर ट्युशन घेणारे पौणीकर सर फेमस होते त्यांच्याकडे आम्ही ट्युशनला जायचो..त्यावेळेस कोचिंग म्हणायची फॅशन न्हवती..क्लासमध्ये जाऊन मग फक्त अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करून अभ्यासक्रम सुरू ठेवायचो.. results कधीच मागे पडले नाहीत ह्याचा आनंद तर बहुमूल्यच...
आनंद या गोष्टीचा आहे की कालच्या त्या अगदी सामान्य गोष्टी आजही मनाला मागे हिरावून नेतात, तीच अवीट गोडी अजूनही आहे मनात पण आता त्या सामान्य गोष्टी लुप्त झाल्यात.
भपकेबाज आणि वरवर दाखवणारी दुनिया जवळ आलीय पण मनाला तसा दिलासा मिळत नाही...ठीक आहे पण जगताना आनंद हवाच तो शोधणे आपल्या हाती असतो...म्हणून मी आनंद व्यक्त केला... माझ्यासारखं अजूनही कुणीतरी या ग्रूप वर असेलच..माझी एखादी मैत्रीण या निमित्ताने मला आठवेल..यावर अजून काय हवंय...हेच माझं सुख