नागपूर आठवतांना ग्रीष्म ऋतू

नागपूर आठवतांना ग्रीष्म ऋतू

नागपूर आठवतांना: ग्रीष्म ऋतू

@नागपूर(मार्च ते जून -७०च्या दशकातले!) मंडळी!होळीचा सण हा नुकताच आटोपला आहे आणि आता आपली वाटचाल ही उन्हाळ्या कडे , सुरू झालेली आहे, म्हणजे असं की आता ऊन, हळूहळू कडक होत जाणार घरात धीमा पंखा सुरू झाला अन् शालब्लँकेट जाऊन, रात्री अंगावर

पांघरायला,चादर पुरेशी वाटते.ही भूमिका याकरिता की,परवा असाच बसलो असताना, मला

७० च्या दशकात, तिथं काढलेले मार्च ते जून हे उन्हाळी महिने आठवून गेले.आज,एक नजर,

त्यांच्यावरचतसं बघायला गेलं तर, हा सारा वातावरणातला बदल, साधारण महाशिवरात्री पासून जाणवू लागे,त्या काळी. होळी झाली की मग प्रकर्षाने भासू लागत असे.जर आपल्या सणांच्या भाषेत सांगायचे झाले तर हा प्रवास होळी ते रामनवमी तेअक्षय तृतीया म्हणजेच साधारण

मार्च ते जून असा मांडता येईल.होळी झाली की अनेक घरांमधे ,पाण्याला माठ सुरू होत असे तर रामनवमी नंतर बरीच मंडळी , अंगणात झोपणं सुरू करीत. रामनवमी वरून

आठवले. आमच्या चिटणवीस पुरा घरासमोरच ,दिधे यांचे राम मंदिर होते जिथे राम जन्म

साजरा होई आणि या प्रसंगी दुपारी १२ वाजता, बरीच मंडळी जमत असतएप्रिल पासूनच उन्हाचा तडाखा सुरू होऊन जात असे आणि सकाळी १० नंतर , बाहेर पडणं जिवावर येई. पडायचे झालेच

तर पूर्ण तयारीनिशी पडावे लागे, म्हणजे डोळ्यांवर काळा  चष्मा, डोक्यावर टोपी, कानावर रूमाल आणि खिशात कांदानंतर मे महिना म्हणजे उकाडा आपल्या "पीक' वर, कमाल तापमान हे १०८-११२ डिग्री फैम्हणजे आजच्या भाषेत,४० ते ४२ डिग्री सेल्सिअस. आता तर अधिकांश मे मधे हे ४५+से. असते,असे ऐकतो! पण यात सुद्धा,मजा असायची! पन्हंसरबत , आइस्क्रीम यांचा भरपूर वापर- सदरच्या दिनशाॅत एक फेरी व्हायचीच! शिवाय रसवंती चे चक्कर पणनंतर,हे सरून, जून पहिला

आठवडा सुरू झाला की एखाद्या संध्याकाळी, अवचित,पावसाची हल्की सर येऊन जायची ज्याला

तज्ञ मंडळी ,प्रि - मान्सून शाॅवर्स म्हणत! याचाच अर्थ असा की आता उन्हाळा सरत आला!

याविषयी, अजून बरंच काही सांगता येईल पण इथंच थांबतोउर्वरित जानकारी,वाचक , जरूर पुरवतील,या आशेसह!

 

Share blog on whatsapp

1 Comments

Meheresh Mulmule

What beautiful memories you've brought to life! The Nagpur summers of the 70s were truly a unique experience. Reading about the cool water from the clay pot, panha-sharbat, ice cream at Sadar Dinshaw's, and an onion in the pocket — I felt instantly transported back to that era! The crowds at the Ram temple at noon on Ram Navami, and the fun of sleeping in the courtyard — today's generation would find all this hard to imagine. In the age of AC and coolers, we truly miss that simple yet joyful life. Thank you from the heart for penning such memories! Keep them coming!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *