नागपूर काही चौक!
मंडळी! प्रत्येक शहरात, यात मग नागपूर आलंच , विविध चौक फार महत्त्वाची भूमिका बजावत असतात.जुन्या काळी तर कुठं राहता या प्रश्नाचे उत्तर,लोकं अमक्या चौकाजवळ , असेच द्यायचे! तसं पाहिलं तर प्रत्येक चौकाची आपली एक कहाणी असते ,एक इतिहास असतो, अन् आपल्या काही आठवणी पण या चौकांशी निगडित असतात अन् शहर सोडले तरी आठवण सोबत राहून जातात. ही भूमिका ह्यासाठी की परवा असाच बसलो असताना,तिथले
काही चौक आठवून गेले, जेथून नियमित येणं -जाणं असे. आज त्याच आठवणी,इथं!
सुरूवात, झेंडा चौक, महाल हून , कारण तो घराजवळच होता. इथंच होते नाकाडे आणि माणिक किराणा आणि जवळच
होती नटराज टाॅकीज जिथं ममता,बाॅबी आणि सामना हे चित्रपट पाहिल्याचे आठवते. चिटणवीस वाडा इथली मंगल
कार्यालय पण ,चौका जवळच.आता,राणी झाशी चौक वर येऊ. तेव्हा खरं तर हा चौक म्हणजे शहराचे ह्रदय स्थळ!
समोर धनवटे रंग मंदिर आणि बाजूला,मोर भवन बस टर्मिनस. महालातील,बडकस चौक,आता बच्छराज व्यास
चौक,हा फार महत्वाचा. केळीबाग रोड वरून इतवारीत जायला ,हा चौक पार करणं आलंच. जवळच राम भंडार
हे प्रसिद्ध मिठाई दुकान आणि पाटोडीचे सुद्धा! पश्चिम नागपूर इथला आठ रस्ता चौक पण फार महत्त्वाचा असाच.जवळच सायंटिफिक सभागृह आणि पूर्ती माॅल, तसेच जेरिल लाॅन पण. इतकाच , किंबहुना थोडा जास्त, अधिक जुना म्हणून, लक्ष्मी भवन चौक! नजीकच, जोशी मंगल, तसेच नंद आणि राज भंडार ही मिठाई दुकानं आणि नारायण किराणा.
अजूनही काही प्रमुख चौक राहिलेच! विशेष म्हणजे मेडिकल आणि शंकरनगर चौक येथून पाच रस्ते फुटतात!
असो. आता आवरतं घेतो.