कालचीच गोष्ट. समूहावर अलिकडे आलेल्या काही पोस्ट चाळत बसलो होतो. तर इथं ,जुन्या घरांची ठेवण विदर्भातील
काही एसटी रुट , श्रावण मास ,काॅलेज शिक्षण इ विषय चर्चिले गेले आहेत,असे
दिसले. पण इथली सिनेमागृहे आणि सिनेमा
यावर अभावानेच काही वाचायला मिळाले आहे ! मी काही सिने शौकीन नाही पण
१९७०-७७ काळच्या काही आठवणी तर
नक्कीच आहेत - सिनेमा गृहं आणि सिनेमा
यांच्या ! आज ,त्यांना एक उजाळा !
पहिली गोष्ट सांगायची ती ही की त्या काळी,नागपूरात सिनेमागृहे ही ,दीड डझनाच्या वर होती. गंमत म्हणजे यातील
अर्धा डझनाच्या वर , लोखंडी पूल ओलांडला की ,बर्डी एरियात वसलेली होती
अगदी आनंद-वसंत पासून ते रीगल- रीजंट
पर्यंत ! रीजंटला बहुदा मराठी सिनेमे लागत
असत तर सदरच्या लिबर्टीला इंग्रजी ! सरोज
( म्हणजेच नंतरची सुदामा- आता नामशेष) ही बहुदा १९७३ नंतर आकाराला आली
असावी.
तेव्हाचे पाॅश थिएटर्स म्हणजे पंचशील,
लिबर्टी आणि सरोज ,नाही का ? घराच्या
सर्वात जवळ म्हणजे नटराज आणि नंतर
राजविलास , नरसिंग. नरसिंगला जय
संतोषी माता ,तूफान चालल्याचे स्मरते,
महिला वर्गाच्या उदंड प्रतिसादामुळे ! या
काळात ,माझे सिनेमाला जाणे तसे फार
नव्हते पण दिग्दर्शक श्याम बेनेगल आणि
जया भादुडी यांची क्रेझ ! आता विषय
निघालाच आहे तर पाहिलेले काही सिनेमे
असे: नटराज ( जवानी दिवानी बाॅबी,सामना) ,राजविलास( शोर ,ज्यूली)
आनंद (परिचय ,दाग) ,रीगल (अनुभव, कोशिश ,कोरा कागज) , सरोज (निशांत)
आणि लिबर्टीला ,२-३ इंग्रजी.
समकालीन सदस्यांच्या पण अश्याच काही
आठवणी असतील ,खरं ना