जुन महिना संपत आला की शहरातील अनेकांची पावले मुख्य भाजी बाजार असलेल्या काॅटन मार्केट कडे वळतात.या ठिकाणी वेगवेगळ्या लोणच्याच्या कैर्या ठोक भावात मिळतात.
अनेक दुकानदार या कैर्या फोडून पण देतात.
अगोदर लोणचे मोठ्या प्रमाणात घालत असल्याने ते साठवून ठेवण्यासाठी चीनी मातीच्या बरणीचा वापर व्हायचा या बरण्या बर्डी, इतवारीत मिळतात. आजकाल चिनी मातीच्या बरणीचा वापर कमी होऊन काचेच्या बरणीचा वापर वाढला आहे.
जुन महिन्याच्या सुरुवातीला काही सरदारजी सायकलवर आंबे फोडणी ची विळी घेऊन यायचे.ही लोखंडी विळी जाडसर असायची. फक्त आंब्याचे लोणचे घालायची वेळ आली की वस्तू बाहेर निघायची, नाही तर धुळ खात एका कोपऱ्यात पडून असायची.
किराणा दुकानात बेडेकर मसाला आणायचा किंवा सीताबर्डी वर मोदी नंबर तीनमध्ये बापटांच्या किराणा दुकानात, पंडित यांच्या विविध वस्तू भंडार मध्ये पण लोणचे मसाला मिळायचा.
नेताजी मार्केट बर्डीवर पण कच्च्या आंब्याचा फोडी करून मिळायच्या अगोदर.