गायत्री भोजनालय नागपुर

गायत्री भोजनालय

धरमपेठ मध्ये एका जुन्या घरात फार पूर्वीपासून एक मेस होती . गायत्री भोजनालय. 1991 ते 1993 या दोन वर्षात तेथे जेवणाचा योग आला. त्यावेळेस देखील थोडी महागच मेस होती, 700 रुपये महिना. पण जेवणाची quality छान होती. पण मेस खूपच शिस्तप्रिय होती 2.30 वाजता बंद म्हणजे बंद, मग कितीही नियमित ग्राहक असला तरी , मेस चे दार उघडणार नाही. बाहेर टिनाचे शेड होते त्यात उन्हाळ्यात जेवणाची मजा काही औरच होती. माझे कॉलेज व data graphix इन्स्टिट्यूट च्या व्यापामुळे व मेसच्या शिस्ती मुळे अर्धे दिवस उपाशीच रहावे लागत असे.

 

आज गायत्री भोजनालयाची मोठी इमारत धरमपेठ इथे व प्रतापनगर इथे झाली आहे. गायत्री चे जेवण साधेच पण चविष्ट असते. दोन भाज्या, वरण, दही, कढी, कोशिंबीर, कांदा, पोळ्या व भात. गरम गरम पोळ्या येत असल्याने , थोडं जेवण जास्तच होत. गायत्री धरमपेठ ची कढी अप्रतिम, केव्हाही जावं तर एकच चव. सुरवातीला 40रु, 60 रु करत करत आज थाळीचा रेट 180 रु पर्यंत झालेला आहे. पण जेवणाचं समाधान होत.

खास celebration म्हणून गायत्रीत जाण्यासारखं नसलं तरी रविवारी घरी भरपूर पसारा आवरायचा आणि किचन ला आराम देऊन गायत्रीत जेवायचं..स्वस्त सुंदर पैसे वसूल..

बाहेर गावाला जायचे आहे किंवा चार पाच दिवस पिकनिक ला जाऊन जर मसालेदार, तेलकट, पनीर ची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर गायत्रीत जेवावे, एकदम छान वाटते.

वरण, भात, भाजी , पोळी खाऊ घालून एवढा मोठा व्यवसाय होऊ शकतो असे 20 वर्षांपूर्वी वाटले नव्हते.

 

आजकाल गायत्रीत भरपूर भीड असते. एकावेळी 200 जण एका तासात जेवण घेत असतात. सकाळी 4 तास व रात्री 4 तास, म्हणजे 1600 जण दिवसाला जेऊन तृप्त होत असतात.

बाहेर गावातील नागपुरात कार्यालयीन कामासाठी आलेले कर्मचारी, mp मधून दवाखान्यात भरती झालेल्या चे नातेवाईक, sales representative, medical representative तर कधी कधी पेंटिंग चे काम करणारे वर्कर अशी विविध प्रकारच्या माणसाची भीड असते. तर कधी कधी महिला मंडळी चे भिशी याची देखील भीड असते. आजूबाजूला कोण बसले आहे याची कुणीही दखल न घेता जेवत असतात. इथले वाढणारे कर्मचारी देखील प्रेमाने व चिडचिड न करता, काहीही न बोलता वाढत असतात. एकाच डावाने वरण, भाजी, कढी वाढली जाते. पण चवीत मात्र विशेष फरक पडत नसतो.

अजूनही मध्ये मध्ये कॉलेज च्या परीक्षेच्या ब्रेक मध्ये गायत्रीत जाणे होते. सोबतच्या थकलेल्या staff ला भरपेट जेवू घातल्याचा आनंद वेगळाच.

गायत्री मधले जेवण झाल्यावर बाजूला संदीप पान ठेल्यावर जाऊन मसाला पान खायचे आणि घरी येऊन दोन तास वामकुक्षी, म्हणजे सुख म्हणजे काय असत चा अनुभव.

घरगुती, स्वच्छ व चविष्ट तसेच स्वस्त जेवणासाठी नागपुरातील गायत्री चा पर्याय उत्तम आहे.

 

 

 

 

 

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *